ओरोस सिंधुदुर्ग नगरीत रविवार १७ मे रोजी होणार "दर्पण" पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचा भव्य भूमिपूजन सोहळा

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 20 May 2026 | 👁 144 Views
ओरोस सिंधुदुर्ग नगरीत रविवार १७ मे रोजी होणार "दर्पण" पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचा भव्य भूमिपूजन सोहळा
खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, माजी मंत्री आमदार दीपक केसरकर,आमदार निलेश राणे, आमदार प्रमोद जठार ,मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती पत्रकारांना सवलतीच्या दरात हक्काचे घर" या पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेला मुहूर्त स्वरूप
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांच्या हक्काच्या घराचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या पुढाकारातून आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधूदर्पण गृहनिर्माण सोसायटीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी दर्पण पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन १७ मे रोजी दुपारी ४ वाजता सिंधुदुर्ग नगरी येथे खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, माजी मंत्री आणि आमदार दीपक केसरकर,आमदार निलेश राणे, आमदार प्रमोद जठार ,मराठी पत्रकार संघटनेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी,व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे. तरी जिल्ह्यातील पत्रकारांनी आणि सर्व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर,व गृहनिर्माण प्रकल्पाचे चेअरमन संतोष राऊळ यांनी केले आहे.
या गृहनिर्माण प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रम आणि सिंधुदुर्ग नगरी येथील बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन येथे पत्रकारांचे जिल्हास्तरीय स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.या सोहळ्यात पत्रकारांच्या पाल्यांच्या यशाचा ही सन्मान केला जाणार आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पत्रकारांच्या पाल्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव होणार आहे. ज्या पत्रकारांचे पाल्य उत्तीर्ण झाले आहे त्यांनी आपली नावे त्वरित जिल्हा पत्रकार संघाकडे नोंदवावी असे आवाहन करण्यात आले आहे ,स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयासाठी विविध लोककला गुणदर्शन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पत्रकारांसह त्यांच्या पत्नी आणि मुलांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. काल सादरी करण्यासाठी इच्छुकांनी आपली नावे आगाऊ कळविणे आवश्यक आहे. या दोन्ही कार्यक्रमांमध्ये जिल्हा पत्रकार संघाच्या सर्व सदस्याने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे .
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप | "आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदीचे भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन" | सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न. | टाकेवाडीत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात; विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला | गोंदवलेत शाळा व दवाखाना परिसर कचरामय; ग्रामस्थांचा संताप | तोरसोळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण गोठ्यात घुसून मध्यरात्री केला हल्ला; वन विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी | मानपाडा-वाघाडी व सोनाळे खुबरोखपाडा अंधारात; १७ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा | हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव |