आजचा आंबा व काजू बागायतदार मोर्चा होणारच -राजु शेट्टी

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 15 May 2026 | 👁 372 Views
आजचा आंबा व काजू बागायतदार मोर्चा होणारच -राजु शेट्टी
राज्य सरकारने आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. गेल्या अडीच महिन्यांपासून कोकणातील शेतकरी हवालदिल होवून रस्त्यावरची लढाई लढत आहे.
आंबा बागायतदारांना हेक्टरी ५ लाख व काजू बागायतदार यांना हेक्टरी ३ लाख रूपये मदतीसाठी सातत्याने सरकारकडे आर्त हाक देत आहे.
गेल्या दोन अडीच महिन्यांपासून मोर्चा , आंदोलन , रास्ता रोको यासारख्या आंदोलनात आपली मागणीची तीव्रता दाखवूनही फडणवीस सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.
गेल्या ५० वर्षात पहिल्यांदाच कोकणातील शेतकरी काहीतरी मदत मागतोय मात्र त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करून एकीकडे कुंभमेळ्यास ३५ हजार कोटी खर्च करत असताना आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांना मदतीसाठी मात्र हात आखडता घेतला आहे.
सरकारने फक्त चर्चेच्या फेऱ्या केल्या मात्र मदतीबाबत यांच्या हाताला लखवा मारला आहे. आज कोकणातील शेतकरी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून आपली व्यथा मांडणार आहेत.
ज्या शेतकऱ्यांचे आधीच कंबरडे मोडले आहे त्या शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकुण न घेता त्यांना आणखीन आर्थिक आरिष्टात टाकले जात आहे.
आंब्याचा हंगाम संपत आला तरीही सरकारने अजून पंचनामे केलेले नाहीत , केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाकडे मदतीचा प्रस्ताव सादर केला गेला नाही.
सरकारने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत बघत असून राज्यकर्त्यांना राज्यभर फिरताना याची किंमत मोजावी लागणार हे मात्र निश्चीत.
आज दुपारी ३.०० वाजता कोकणातील आंबा बागायतदार शेतकरी गिरगांव चौपाटीवर एकत्रित येवून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी धडक देणार आहे.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी, शिवसेना सचिव माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार बाळ माने, महादेव जानकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, मराठी भाषा केंद्राचे पवार, स्वाभिमान संघटना अध्यक्ष गंडणवार, गणेश गांवकर आदी उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |