कुदळवाडीतील धार्मिक स्थळांची पुनर्बांधणी करा; आरपीआयचे अजिज शेख यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी !

👤 श्रीयश कदम पुणे | 📅 14 May 2026 | 👁 255 Views
कुदळवाडीतील धार्मिक स्थळांची पुनर्बांधणी करा; आरपीआयचे अजिज शेख यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी !
पिंपरी-चिंचवड महापालिकेने कुदळवाडी परिसरात मंदिर आणि मशिदीवर अचानक केलेल्या कारवाईमुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता आणि धार्मिक भावनांचा विचार न करता करण्यात आलेल्या या कारवाईचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (वाहतूक आघाडी) चे राज्याध्यक्ष अजीज भाई शेख यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. धार्मिक स्थळांची पुनर्बांधणी करावी अशी मागणी त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ विजयकुमार सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. पिंपरी येथे (दि.१२)पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अजीज भाई शेख यांनी सांगितले की, प्रशासनाने अतिशय संवेदनशील जागेवर बूट-चपला घालून प्रवेश केला, ज्यामुळे पावित्र्य भंग पावले आहे. शुक्रवारी मुस्लिम समाज नमाजसाठी मशिदीत जातो तसेच शनिवारी हनुमान मंदिरात प्रार्थना होते. अशा पवित्र दिवशी कारवाई करून दोन समाजांत असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.जर ही धार्मिक स्थळे विकासकामात किंवा रस्त्याच्या मध्ये येत असतील, तर प्रशासनाने आम्हाला विश्वासात घेऊन पूर्वकल्पना द्यायला हवी होती.स्वतःहून प्रशासनाला सहकार्य करून जागा ॲडजस्ट करून दिली असती. मात्र, कोणाच्या तरी राजकीय दबावाखाली येऊन अशा प्रकारे अचानक पाडकाम करणे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही असे शेख म्हणाले.


पाडलेली धार्मिक स्थळे महापालिकेने स्वखर्चाने पुन्हा बांधून द्यावीत.धार्मिक स्थळांच्या विटंबनेस कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांची आणि दबाब टाकणाऱ्यांची चौकशी व्हावी. कुदळवाडीतील कारवाईत अनेक वर्षांपासून व्यवसाय करणारे गोरगरीब लोक बेरोजगार झाले आहेत, त्यांना पुन्हा रोजगाराची संधी द्यावी. बांगलादेशी रोहिंग्या मुसलमानाच्या नावाखाली कुदळवाडी मध्ये काही दिवसापूर्वी कारवाई करण्यात आली परंतु प्रत्यक्ष तेथे कोणताही बांगलादेशी व्यक्ती सापडलेला नाही. विकास आराखड्यावर जवळपास ५० हजाराच्या वरती हरकती आहेत त्यांचा निकाल आयुक्तांनी लवकर लावला पाहिजे.संविधानाचा आधार घेऊन आम्ही या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरू. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही गणपती बाप्पांची आरती आणि मशिदीत नमाज पठण करून शांततामय मार्गाने पण ठामपणे आपला विरोध नोंदवू. आमदार महेश दादा लांडगे यांना निवेदन देऊन पुन्हा मंदिर मज्जित बांधण्यासाठी आग्रह करणार आहोत.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सम्राट जकाते, पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीस बाबा सरोदे,गजानन घुगे आदी उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |