बारावी परीक्षेत उतुंग भरारी...
विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज नाझरे ठरले यशस्वी...!!
दैनिक आखुर| नाझरा सोलापूर :- फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेमध्ये नाझरा विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजने घवघवीत यश संपादन करत यशाची परंपरा कायम राखली आहे.कला शाखेचा निकाल ९६.४३% लागला असून वाणिज्य शाखेचा निकाल ९१. ६७ % लागला आहे. ज्युनिअर कॉलेजचा सरासरी निकाल ९४.२३ टक्के लागला आहे. कला शाखेमधून साहिल संभाजी लवटे 63.33% गुण मिळवून ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रथम,प्रथमेश राहुल वाघमारे 65.83% गुण द्वितीय तर प्राजक्ता सत्यवान वाघमारे 61.83% गुण मिळवून तृतीय आली आहे.वाणिज्य शाखेमधून गौरी हरी अडसूळ ७६.१७ % गुण मिळवून प्रथम, ऋषिकेश आगतराव चव्हाण ७१. ६७ % गुण मिळवून द्वितीय तर मुस्तफा दादासो मुलानी 71.33% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पर्यवेक्षक विनायक पाटील, प्रा. महेश विभुते, प्रा. नारायण पाटील, प्रा. मोहन भोसले,प्रा. युवराज लोहार, प्रा.रत्नप्रभा रेड्डी, या मार्गदर्शक शिक्षकांच्या उपस्थितीत प्रशालेमध्ये संपन्न झाला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे,संस्था सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, संस्था कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके, प्राचार्य अमोल गायकवाड, पर्यवेक्षक विनायक पाटील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.