NEET पेपरफुटी प्रकरणी एसएफआय आंबेगाव तालुका समिती आक्रमक; तहसीलदारांना दिले निवेदन

👤 राहुल टिबे सांगली | 📅 16 May 2026 | 👁 637 Views
NEET पेपरफुटी प्रकरणी एसएफआय आंबेगाव तालुका समिती आक्रमक; तहसीलदारांना दिले निवेदन

घोडेगाव: NEET UG 2026 परीक्षेतील मोठ्या प्रमाणावर झालेल्या कथित पेपरफुटीमुळे परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचा 'स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया' (एसएफआय) आंबेगाव तालुका समितीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. या संदर्भातील मागण्यांचे निवेदन मा. पंतप्रधान यांना मा. तहसीलदार यांच्या द्वारे देण्यात आले आहे.

देशभरातील लाखो विद्यार्थ्यांनी वर्षभर कठोर मेहनत घेऊन ही परीक्षा दिली असताना, राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या (NTA) निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला जात असल्याचा गंभीर आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. परीक्षा व्यवस्थेतील सातत्याने होणारे गैरव्यवस्थापन, पेपरफुटी आणि गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर भीती, मानसिक ताण आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी भावना एसएफआय च्या वतीने व्यक्त करण्यात आली. NEET पेपरफुटी प्रकरणाची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक व आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी सरकारने तात्काळ ठोस उपाययोजना कराव्यात इत्यादी आदी मागण्या यावेळी निवेदनात करण्यात आलेल्या आहेत.

यावेळी बोलताना एसएफआय चे तालुका अध्यक्ष समीक्षा केदारी यांनी सांगितले की, ‘शिक्षण क्षेत्रातील केंद्रीकरण आणि ढिसाळ नियोजनामुळे अशा घटना सातत्याने घडत आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असताना, केंद्र सरकार आणि NTA यांची भूमिका यामध्ये अत्यंत निष्क्रिय आणि अपयशी ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होणारा हा अन्याय अजिबात सहन केला जाणार नाही, विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी येणाऱ्या काळात हा संघर्ष अधिक तीव्र केला जाईल.’

यावेळी एसएफआय पुणे जिल्हा समितीचे सहसचिव समीर गारे, कोष्याध्यक्ष योगेश हिले, आंबेगाव तालुका अध्यक्ष समीक्षा केदारी, सहसचिव प्रियंका गोडे, कोष्याध्यक्ष मयूर हिले, सचिव मंडळ सदस्य यश गभाले, सदस्य आकाश खामकर, सृष्टी लोखंडे आदी उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |