ओसरगाव टोलवर MH-07 वाहनांसाठी स्वतंत्र 'लेन

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 27 June 2026 | 👁 206 Views
ओसरगाव टोलवर MH-07 वाहनांसाठी स्वतंत्र 'लेन
पालकमंत्री नितेश राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने मानले आभार जिल्ह्यातील व्यापारी वाहनांना मिळणार 50 टक्के सवलत

कणकवली (प्रतिनिधी) ओसरगाव टोल नाक्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील MH-07 पासिंग वाहनांसाठी स्वतंत्र 'फ्री लेन' उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच व्यापारी वाहनांना टोल मध्ये 50 टक्के सवलत दिल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त करण्यात आले.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील व्यापारी, व्यावसायिक तसेच स्थानिक वाहनधारकांची टोल नाक्यावर होणारी गैरसोय कमी होण्यास मदत होणार असून, व्यापाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय सावंत, कार्यवाह राजू जठार, कणकवली तालुका अध्यक्ष दीपक बेलवलकर, वैभववाडी तालुका अध्यक्ष तेजस आंबेकर, नामदेव वाडेकर तसेच व्यापारी बांधव उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांनी स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांच्या हिताचा विचार करून घेतलेल्या या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करत त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |