मा. संजय काटकर (IAS) यांचा उपजिल्हा रुग्णालय, कवठेमहांकाळ येथे संवाद दौरा; ग्रामीण आरोग्य सेवांना गती देण्याचे निर्देश

👤 विद्याधर लोंढे | 📅 25 July 2026 | 👁 433 Views
मा. संजय काटकर (IAS) यांचा उपजिल्हा रुग्णालय, कवठेमहांकाळ येथे संवाद दौरा; ग्रामीण आरोग्य सेवांना गती देण्याचे निर्देश
सार्वजनिक आरोग्य विभागाचे मा. संजय काटकर (IAS), आयुक्त, आरोग्य सेवा, आयुक्तालय, आरोग्य भवन, मुंबई यांनी उपजिल्हा रुग्णालय, कवठेमहांकाळ येथे भेट देऊन रुग्णालयातील विविध आरोग्य सेवांचा सखोल आढावा घेतला. या भेटीदरम्यान त्यांनी आरोग्य यंत्रणेतील प्रत्येक घटकाशी प्रत्यक्ष संवाद साधत सेवा अधिक दर्जेदार, परिणामकारक व रुग्णकेंद्रित करण्यासाठी आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले.

या प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक, सांगली, मा. डॉ. विक्रमसिंह कदम उपस्थित होते. त्यांनी रुग्णालयातील विविध विभागांची माहिती दिली. आयुक्तांनी रुग्णालयातील सर्व विभागांची पाहणी करून आशा स्वयंसेविका, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर (CHO), ए.एन.एम. (ANM), राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत कार्यरत कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, आहार सेवा, प्रयोगशाळा विभाग तसेच इतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी आणि सूचनांची सविस्तर माहिती घेतली. ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक सक्षम, दर्जेदार आणि वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

भेटीदरम्यान जन्मतः ऐकू न येणाऱ्या कर्णबधिर बालकांचे लवकर निदान, वेळेत निदान श्रवण तपासणी, तज्ज्ञांकडे त्वरित संदर्भ (Referral) आणि उपचार उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाने प्रभावी समन्वयाने कार्य करण्याची गरज असल्याचे मा. आयुक्तांनी अधोरेखित केले.
यावेळी डॉ सुधीर कदम कर्णबधिर तज्ञ यांनी आयुक्तांना कर्णबधिर निदान याविषयी सादरीकरण केले. ग्रामीण भागातील प्रत्येक बालकापर्यंत या लवकर निदान सेवा पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

यावेळी उपजिल्हा रुग्णालयाच्या दंत विभागाने गेल्या आठ महिन्यांत मुख कर्करोगाचे तीन रुग्ण प्रारंभिक अवस्थेत शोधून त्यांना वेळेत उपचाराखाली आणल्याबद्दल मा. आयुक्तांनी विशेष समाधान व्यक्त केले. प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आणि लवकर निदानाच्या दृष्टीने हे कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगत दंत शल्यचिकित्सक डॉ. नागेश शेवारे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय सुमन मारुती भोसेकर, डॉ. पर्वत खाडे, डॉ. संदीप सूर्यवंशी, डॉ. निखिल देशमुखे, डॉ. गुरुदत्त सनगर, डॉ. हर्षला कदम, डॉ. आशा पाटील, कार्यालयीन अधिकारी अविनाश बेग, गोपाळ पाचफुले, अनुपमा बोंगाळे, योगिता गवळी, वैभव भोसले, अभिजित पाटील, परिसेविका वनिता माडकर, नर्सिंग अधिकारी मंजुळा चंदनशिवे, आशा पाटील, शिवस्वराज पाटील, प्रशांत ढेपे, भक्तराम फड, साईराज ठोंबरे, सोनू नागरगोजे, काजल सावंत, स्वीटी शास्त्री, रेचल सावर्डेकर, शायनाज मुलाणी, समाधान खरात, धीरज चव्हाण, सारिका कोस्त, औषध निर्माण अधिकारी यशोदा सरगर, शाम गुळुमकर, क्ष-किरण विभागाचे फिरोज मुजावर, प्रकाश खाडे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी शाहिस्ता मुल्ला, संतोष आमने, राजान्ना रखवालदार, सोनाली वाठारे, प्रतीक पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सतिश कोळेकर, सतिश सांगळे,डॉ नंदा जानकर, डॉ अनिता पाटील, डॉ रोहिणी कुंभार, संपदा निकम, सुजाता बनसोडे तसेच संजय शिंदे, शंकर सगट, प्रकाश जाधव, अक्षय जगनाडे, तातोबा मासाळ, रवी साबळे, राहूल गिरी, सुरक्षा रक्षक दत्ता देसाई यांच्यासह रुग्णालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी, आरोग्य सेवक व कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दौऱ्याच्या शेवटी मा. आयुक्तांनी उपजिल्हा रुग्णालय, कवठेमहांकाळ येथील विविध आरोग्य सेवा, कर्मचारीवर्गाचे समर्पित कार्य आणि रुग्णसेवेप्रती असलेली बांधिलकी यांचे कौतुक करत "ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार, सुलभ आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा पोहोचविणे हेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रमुख ध्येय आहे," असे सांगून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिक उत्साहाने व समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन केले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |