HSRP नंबर प्लेट साठी मुदत संपली; पुढे मुदतवाढ कि कारवाई

👤 राहुल टिबे ईश्वरपूर,सांगली | 📅 30 June 2026 | 👁 502 Views
HSRP नंबर प्लेट साठी मुदत संपली; पुढे मुदतवाढ कि कारवाई
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्यासाठी दिलेली शेवटची मुदत 30 जून रोजी संपली. पाच वेळा मुदतवाढ देऊनही नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळाल्याने उदया , 1 जुलैपासून दंडात्मक कारवाई सुरू होणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.
मंत्री सरनाईक म्हणाले की, आतापर्यंत महाराष्ट्रात 1 कोटीपेक्षा जास्त बुकिंग दाखल झाली असून, त्यापैकी जवळपास 93 लाख गाड्यांना HSRP नंबर प्लेट बसवण्यात आल्या आहेत. मात्र, अजूनही जवळपास 50 लाख गाड्या बाकी आहे.परिवहन आयुक्तांनी सांगितले की, वारंवार मुदतवाढ देऊनही लोक नंबर प्लेट बसवत नसल्याने 1 जुलैपासून ज्या वाहनांना HSRP बसवलेली नाही, अशा वाहनांवर ₹1,000 पर्यंत दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाहनांचा गैरवापर रोखण्यासाठी HSRP अत्यंत महत्त्वाची आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार जुन्या वाहनांनाही HSRP बंधनकारक केली आहे. लोकांनी दिलेल्या संधीचा फायदा घेतला नाही, त्यामुळे आता कारवाई अटळ आहे," असे सरनाईक यांनी सांगितले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |