शाहूवाडी बांबवड्यात FDA चा थरार! नामांकित हॉटेल्स, बेकऱ्यांवर धाडी; ग्राहकांना सोडून मालक पळाले

👤 प्रदीप जानकर शाहुवाडी | 📅 18 July 2026 | 👁 216 Views
शाहूवाडी बांबवड्यात  FDA चा थरार! नामांकित हॉटेल्स, बेकऱ्यांवर धाडी; ग्राहकांना सोडून मालक पळाले
शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे परिसरामध्ये अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने अत्यंत गोपनीय पद्धतीने सर्वात मोठी आणि धडक कारवाई केली आहे. बांबवड्यातील हॉटेल्स, बेकरी आणि महामार्गावरील धाब्यांवर अचानक पडलेल्या या धाडींमुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. खळबळजनक बाब म्हणजे, हॉटेलमध्ये ग्राहकांची गर्दी असतानाच कारवाईच्या भीतीने मालकांनी ग्राहकांना तसेच सोडून दुकानांची शटर डाऊन केली आणि तिथून पळ काढला! आज, १५ जुलै २०२६ रोजी झालेल्या या कारवाईने भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.कारवाईची एवढी धास्ती की परिसर झाला 'ब्लॅक आऊट'!अन्न व औषध प्रशासनाने या छाप्याची माहिती अत्यंत गुप्त ठेवली होती. मात्र, बांबवड्यात शासकीय गाड्यांचा ताफा शिरताच अनेक हॉटेल आणि बेकरी चालकांची मोठी पळापळ झाली. या कारवाईचा धसका एवढा मोठा होता की, गोगवे, डोणोली आणि आजूबाजूच्या परिसरातील धाबेचालकांनी कुठलीही रिस्क न घेता आपले धाबे तातडीने बंद केले आणि संपूर्ण परिसरात शुकशुकाट पसरला.नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांचा होणार गेम; नमुने जप्त!संशयास्पद आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांचे अनेक नमुने पथकाने जागेवरच जप्त केले असून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. लॅबचा अहवाल येताच नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या एकाही दोषीला सोडणार नाही, थेट कडक कायदेशीर आणि फौजदारी कारवाई करणार, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. या कारवाईमुळे परिसरात अजूनही तणावाचे वातावरण आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |