पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकरांच्या उपस्थितीत कसर येथे बीबीएफ (BBF) तंत्रज्ञानाद्वारे सोयाबीन लागवड प्रात्यक्षिक संपन्न!

👤 बळीराज भराडे परभणी | 📅 28 June 2026 | 👁 586 Views
पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकरांच्या  उपस्थितीत कसर येथे बीबीएफ (BBF) तंत्रज्ञानाद्वारे सोयाबीन लागवड प्रात्यक्षिक संपन्न!
जिंतूर तालुक्यातील मौजे कसर येथे कृषी विभागाच्या वतीने बीबीएफ (Broad Bed Furrow - रुंद वरंबा सरी) तंत्रज्ञानाचा वापर करून सोयाबीन लागवड प्रात्यक्षिकाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला परभणी जिल्ह्याच्या सन्माननीय पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी प्रमुख उपस्थिती लावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आणि स्वतः शेतात जाऊन या आधुनिक पेरणी पद्धतीची पाहणी केली. हवामानातील अनिश्चिततेच्या काळात पिकांचे नुकसान
टाळण्यासाठी आणि सोयाबीन उत्पादनात वाढ करण्यासाठी 'बीबीएफ' तंत्रज्ञान अत्यंत फायदेशीर ठरत आहे. या पद्धतीमुळे अतिवृष्टी झाल्यास पाण्याचा योग्य निचरा होतो आणि कमी पाऊस पडल्यास जमिनीत दीर्घकाळ ओलावा टिकून राहण्यास मदत होते, असे प्रतिपादन यावेळी पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी केले. तसेच
तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहनही त्यांनी केले. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती: या प्रात्यक्षिक कार्यक्रमाप्रसंगी कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित राहून त्यांनी शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले.
यावेळी प्रामुख्याने:किशोर खिस्ते,अभिजीत पारवे, माधव दराडे, आत्माराम पवार, विठ्ठल शिंदे सरपंच कसर, नितीन घुगे (तालुका कृषी अधिकारी) सुनील कदम (मंडळ कृषी अधिकारी) स्वप्निल देशमुख (सहाय्यक कृषी अधिकारी)
गजानन घुगे (सहाय्यक कृषी अधिकारी) यांच्यासह कृषी विभागाचे इतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान तालुका कृषी अधिकारी श्री. नितीन घुगे यांनी बीबीएफ यंत्राची कार्यपद्धती आणि बीजप्रक्रियेचे महत्त्व याविषयी शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी मौजे कसर आणि परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप | "आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदीचे भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन" | सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न. | टाकेवाडीत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात; विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला | गोंदवलेत शाळा व दवाखाना परिसर कचरामय; ग्रामस्थांचा संताप | तोरसोळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण गोठ्यात घुसून मध्यरात्री केला हल्ला; वन विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी | मानपाडा-वाघाडी व सोनाळे खुबरोखपाडा अंधारात; १७ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा | हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव |