सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न.

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 27 July 2026 | 👁 238 Views
सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न.
सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न झाली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मा.मनीषजी दळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. अनिरुद्ध देसाई, स्टाफ सोसायटी चे अध्यक्ष निलेश कनयाळकर, उपाध्यक्ष दत्ता कोरगावकर, सचिव सुनील फणसेकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मा. प्रमोद गावडे, कार्यलक्षी संचालक दिवाकर देसाई, कर्मचारी प्रतिनिधी देवेंद्र धुरी, युनियन सेक्रेटरी दिगंबर गवाणकर, सर्व संचालक मंडळ, सभासद आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या प्रत्येक सभासदांसाठी रुपये 10 लाखाचा विमा स्टाफ सोसायटी मार्फत उतरविण्यात येणार असल्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करणेत आला, यासाठी उपस्थित सभासदांनी संचालक मंडळाचे विशेष अभिनंदन केले.

यावेळी बँकेचे अध्यक्ष मा. मनीषजी दळवी यांनी बोलताना स्टाफ सोसायटी च्या आर्थिक प्रगती बद्दल समाधान व्यक्त केले तसेच संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन बँक खंबीरपणे संस्थेच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. अनिरुद्ध देसाई यांनी संस्थेच्या धोरणात्मक बदलामध्ये आपले पूर्ण पणे मार्गदर्शन असेल असे आश्वासन देऊन संस्थेच्या कामकाजचे कौतुक केले. संस्था अध्यक्ष निलेश कनयाळकर यांनी आपल्या मनोगतात संस्थेचा कारभार पारदर्शक पणे चालवीणार असल्याचे अधोरेखित केले. उपाध्यक्ष दत्ता कोरगावकर यांनी प्रास्थाविकात संस्थेचा आर्थिक लेखा जोका मांडून संस्थेचा आर्थिक प्रगतीचा अहवाल सादर केला. यावेळी संस्थेच्या सभासदांच्या पाल्यांचा शैक्षणिक उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल स्टाफ सोसायटी च्या वतीने मान्यवारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्था सभासदांची उपस्थित उल्लेखनीय होती.
यावेळी मान्यवरांसोबत व्यासपीठावर संस्था संचालक पूर्णाणंद सरमळकर, राजेंद्र गावकर, रोहन म्हापसेकर, जयेश सावंत, बाबुराव ठाकूर, संतोष कोणकर, श्यामसुंदर गवस, सतीश आटक, उल्हास रनशूर, पद्माकर ठाकूर, विश्वनाथ डोर्लेकर, युगा पेडणेकर, अनिता राठोड, कर्मचारी सौ. खोत, सौ. बंगे, रमेश परब आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव सुनील फणसेकर, प्रास्ताविक उपाध्यक्ष दत्ता कोरगावकर तर आभार संचालक लक्ष्मण लिंगायत यांनी मानले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |