राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत एकूण 4,00,215 बालकांना पोलिओ डोस देण्यात आला असून जिल्ह्याचे 91.66% उद्दिष्ट पूर्ण झाले आहे

👤 अतुल फसाले | 📅 29 June 2026 | 👁 138 Views
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत एकूण 4,00,215 बालकांना पोलिओ डोस देण्यात आला असून जिल्ह्याचे 91.66% उद्दिष्ट पूर्ण झाले आहे
वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे जनजागृती, प्रचार व प्रसिद्धी, आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुलाखती तसेच आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविकांच्या गृहभेटीद्वारे मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आल्याने 91.66% उद्दिष्ट पूर्ण झाले.


*सोलापूर, दि. 28 जून 2026* - सोलापूर जिल्ह्यात आज रविवार दि. 28 जून 2026 रोजी राबवण्यात आलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत एकूण 4,00,215 बालकांना पोलिओ डोस देण्यात आला असून जिल्ह्याचे 91.66% उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.

याबाबत माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांनी सांगितले की, जिल्ह्यात 0 ते 5 वर्षांखालील अपेक्षित 4,36,598 बालकांपैकी 4,00,215 बालकांना म्हणजेच 91.66% बालकांना पोलिओ लस देण्यात आली.

यामध्ये ग्रामीण भागातील अपेक्षित 4,36,598 पैकी 4,00,215 बालकांना लस देण्यात आली असून 91.66% उद्दिष्ट साध्य झाले. शहरी भागात जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडील अपेक्षित 43,667 पैकी 37,771 बालकांना म्हणजेच 86.50% व सोलापूर महानगरपालिका हद्दीतील अपेक्षित 1,06,043 पैकी 93,344 बालकांना म्हणजेच 88.02% लसीकरण पूर्ण झाले.

मोहिमेसाठी ग्रामीण भागात 5,570, शहरी भागात 570 व महानगरपालिका भागात 373 असे एकूण 6,513 लसीकरण बूथची सोय करण्यात आली होती. लसीची मात्रा देण्यासाठी 7,222 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. पर्यवेक्षणासाठी वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्यात आली होती.

बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, बाजार, विटभट्ट्या, साखर कारखाने, यात्रा, लग्न समारंभ या ठिकाणी पोलिओ डोस पाजण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. भटक्या वसाहती व ऊसतोड कामगारांच्या वसाहतीतील बालकांसाठी मोबाईल टीम कार्यरत होत्या.

वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे जनजागृती, प्रचार व प्रसिद्धी, आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुलाखती तसेच आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविकांच्या गृहभेटीद्वारे मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आल्याने 91.66% उद्दिष्ट पूर्ण झाले.

उर्वरित बालकांचे लसीकरण ग्रामीण भागात तीन दिवसांच्या गृहभेटींद्वारे व शहरी भागात पाच दिवसांच्या गृहभेटींद्वारे (आय.पी.पी.आय.) पूर्ण करण्याचे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांनी दिले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |