20 जुलैपासून राज्यात गुटखा, मावा, तंबाखूवर पूर्ण बंदी; तुकाराम मुंढे यांचा आदेश
👤 राहुल टिबे ईश्वरपूर,सांगली |
📅
15 July 2026 |
👁 571 Views
मुंबई : -राज्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने 20 जुलै 2026 पासून राज्यभरात गुटका, मावा, पान मसाला आणि तंबाखूची विक्री, साठवणूक आणि वापरावर पूर्ण बंदी घालण्याचा आदेश देण्यात आला आहे.
अन्नसुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्यासाठी कठोर भूमिका घेणारे तुकाराम मुंढे यांनी हा आदेश दिला असल्याची माहिती आहे.किरकोळ आणि घाऊक विक्री पूर्णपणे बंद ठेवावी.दुकाने, गोदामे आणि इतर ठिकाणी साठा ठेवण्यास मनाई त्यानुसार पानटपरी, किराणा आणि इतर सर्व दुकानांना लागू आहे तसेच उत्पादक, विक्रेते आणि ग्राहक सर्वांनाच हा नियम बंधनकारक गुटका, मावा, तंबाखूमुळे तोंडाचा कॅन्सर, हृदयविकार आणि इतर गंभीर आजार होतात. तरुण पिढी व्यसनाधीन होत असल्याने सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले होते. त्यामुळे हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
20 जुलै नंतर अन्न व औषध प्रशासन, पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत संयुक्त तपासणी मोहीम राबवली जाईल. नियमभंग करणाऱ्यांवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल.