गैरकायदा जमा करून मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी वैभव नाईक, संदेश पारकर यांच्यासहित 18 जण निर्दोष

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 22 July 2026 | 👁 15 Views
गैरकायदा जमा करून मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी वैभव नाईक, संदेश पारकर यांच्यासहित 18 जण निर्दोष
जन आशीर्वाद यात्रेदरम्यान घडला होता प्रकार संशयीतांच्या वतीने ऍड.उमेश सावंत यांचा युक्तिवाद
तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान गैरकायदा जमाव करत घोषणाबाजी करून जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी माजी आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यासहित 18 जणांची येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एस. जी. लतुरिया यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्यावतीने एड. उमेश सावंत व एड. विरेश नाईक यांनी काम पाहिले.

27 ऑगस्ट 2021 रोजी तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भारतीय जनता पक्षाच्यावतीने जन आशीर्वाद यात्रा आयोजित केली होती. या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कणकवली पोलिसांकडून भाजप व शिवसेना पक्ष यांचे पदाधिकारी यांना सीआरपीसी कलम 149 नुसार नोटीस देण्यात आली होती. तसेच जिल्हाधिकारी यांनी मनाई आदेशही लागू केले होते. असे असताना शिवसेना कार्यालय येथे बेकायदा एकत्र येत घोषणाबाजी करण्यात आली होती. याप्रकरणी माजी आमदार वैभव नाईक यांच्यासहित सतीश सावंत, संजय आग्रे, भूषण परुळेकर, रिमेश चव्हाण, हर्षद गावडे, शैलेश भोगले, राजू राठोड, सचिन सावंत, बबन शिंदे, मंदार केणी, प्रसाद चव्हाण, यतीन खोत. महेश कांदळगावकर. नामदेव कासवकर. संदेश पारकर, कन्हैया पारकर, अतुल रावराणे आदींवर भादवि कलम 143 188 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951
चे कलम 37 (1) (3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला
होता.

सुनावणीअंती न्यायालयाने सर्व अठराही आरोपींची निर्दोषमुक्तता केली.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |