आषाढी यात्रा कालावधित कलम 163 चे घोषणापत्र जारी

👤 अतुल फसाले | 📅 19 June 2026 | 👁 23 Views
आषाढी यात्रा कालावधित कलम 163 चे घोषणापत्र जारी

सोलापूर दि.18 - मा. पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी त्यांचेकडील पत्र क्र. जिविशा/आषाढीवारी / 2026-4591489 दि.05 जून 2026 अन्वये श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढीवारी यात्रा दि. 19जुलै 2026 ते दि.29 जुलै 2026 याकालावधीत भरत आहे. यात्रेचा मुख्य दिवस दि.24 जुलै 2026 दशमी, दि. 25 जुलै 2026 देवशयनी आषाढी एकादशी व दि. 29 जुलै 2026 पौर्णिमा आहे. आषाढीवारी कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात वारकरी / भाविक लोक श्री क्षेत्र पंढरपूर येथे येत असतात .
कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात वारकरी / भाविक लोक श्रीक्षेत्र पंढरपूर येथे येत असतात तसेच देशात, राज्यात व महत्त्वाच्या शहरे, धार्मिक व पर्यटन स्थळे इ. ठिकाणी दहशतवादी कारवायात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. दहशतवादी कारवाया करणारे दहशतवादी हे स्थानिक लोकात मिसळुन तात्पुरत्या स्वरुपात वास्तव्य करुन घातपाती कारवायांना अंतिम रुप देतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणातं मानवी जिवीताचे व मालमत्तेचे नुकसान होत असून त्याचबरोबर अशा घटनांमुळे जनमाणसात घबराटीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणाऱ्या घटना वारंवार घडत आहेत. सदर दहशतवादी कारवायामध्ये दहशतवादी हे जुनी वाहने, तसेच इतर वस्तुंचा वापर केल्याचे यापुर्वी आढळले आहे. तसेच ते सदर कारवायाच्या वेळी रुम / फ्लॅट / लॉज भाड्याने घेवून राहतात. मस्जिद, चर्च, धर्मशाळा येथे आश्रय घेतात किंवा सदरची जागा विकत किंवा लिजने घेतात. त्यासाठी ते स्थानिक ओळख म्हणून प्रॉपर्टी डिलर / ब्रोकर / एजंन्ट जुने वाहन खरेदी-विक्रि करणारे दुकानदार यांची मदत घेतात.

जिल्ह्यातील नविन राहण्यासाठी येणारे व्यक्ती, यांची माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून सोलापूर जिल्ह्यातील आपल्या स्थळ सिमा हद्दीत जी-जी व्यक्ती नव्याने राहण्यासाठी येईल त्या व्यक्तीस व जे कोणी अशा व्यक्तीस राहण्यास जागा उपलब्ध करुन देईल असे घरमालक, प्रॉपर्टी डिलर, ब्रोकर, एजंन्ट, मस्जिद, चर्च, धर्मशाळा इत्यादीचे विश्वस्त यांना अशा अनोळखी नविन राहावयास आलेल्या व्यक्तींची त्यांच्या वास्तव्यासंबंधीची संपूर्ण माहीती न चुकता तो राहावायास आल्यानंतर किंवा विचारपुस केल्यावर लगेच संबंधीत पोलीस ठाणेला देणे गरजेचे आहे. जेणेकरुन भविष्यात होणाऱ्या दहशतवादी कारवाईस, गुन्ह्यास प्रतिबंध होवु शकतो व सार्वजनिक कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अबाधित राहण्यास सहाय्य होईल. तसेच लोकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होवुन सार्वजनिक शांतता वाढीस लागण्यास बळ मिळेल. तरी वरील नमुद सर्व परिस्थितीचा विचार करुन याकरीता सोलापूर ग्रामीण जिल्हयात व सर्व नगरपालिका हद्दीत दिनांक-08 जून 2026 पासून पुढे 60 दिवस कालावधीत भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे घोषणापत्र लागू होणेस विनंती केली आहे.

आणि ज्याअर्थी असा आदेश काढण्यापूर्वी जिल्हयातील सर्व लॉज, हॉटेल, फ्लॅट, दुकाने, घर / जागा धार्मिक स्थळांचे विश्वस्त वा काळजीवाहक, प्रॉपर्टी डिलर, ब्रोकर, एजंट, जुने घर खरेदी विक्री करणारे व्यक्ती व संस्था तसेच भाडयाने घर देणारे व्यक्ती व संस्था / घर मालकांना नोटीस देऊन त्यांची बाजू ऐकणे शक्य नसल्याने एकतर्फी आदेश काढणे आवश्यक असल्याने
अपर जिल्हादंडाधिकारी अभिजीत पाटील यांच्या भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन आदेश दिला आहे की, सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व लॉज, हॉटेल, फ्लॅट, दुकाने, घरमालक, प्रॉपर्टी डिलर / ब्रोकर / एजंट, जुने घर विक्री-खरेदी करणारे व्यक्ती व संस्था, भाडयाने घर देणारे व्यक्ती व संस्था तसेच धार्मिक स्थळांचे विश्वस्त व काळजीवाहक यांना खालील कृत्यांना बंदी घालत आहे.
आषाढीवारी कालावधीत फ्लॅट, लॉज, मठ, धर्मशाळा, चर्च, मशिद, मंदिर व खाजगी निवासस्थाने या ठिकाणी अनोळखी अथवा संशयित इसमास त्याची ओळख पटवल्याशिवाय राहण्यास परवानगी देवु नये. भाडेकरुकडून रहिवाशी व ओळख असलेला पुरावा इत्यादी कागदपत्रांच्या छायांकीत प्रती घ्याव्यात.
आषाढोवारी कालावधीत स्फोटक पदार्थ, बार उडणारे पदार्थ सोबत बाळगू नये. तसेच गॅस, केरोसीन, डिझेल, पेट्रोल याचा वापर अत्यंत काळजीपुर्वक करुन सुरक्षित ठिकाणी ठेवावीत.
हा आदेश हा दिनांक-08 जुन 2026 पासुन पुढे 60 दिवस सोलापूर जिल्हयाचे ग्रामीण हद्दीत (पोलीस आयुक्तालय हद वगळून) व सर्व नगरपालिका हद्दीत लागू राहील. असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी अभिजीत पाटील यांनी दिले आहेत.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |