अवैध गोवा बनावटीच्या मद्यसाठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई सोलापूर जिल्ह्यात 11 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

👤 अतुल फसाले सोलापुर | 📅 14 May 2026 | 👁 154 Views
अवैध गोवा बनावटीच्या मद्यसाठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई सोलापूर जिल्ह्यात 11 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने सोलापूर जिल्ह्यात अवैधरीत्या साठवून ठेवलेल्या गोवा बनावटीच्या विदेशी मद्यावर धडक कारवाई करत एकूण 11 लाख 55 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका इसमाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यास अटक करण्यात आली आहे.
मा. डॉ. राजेश देशमुख, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, मा. प्रसाद सुर्वे, सह आयुक्त (अं.व.द.), राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच मा. सागर धोमकर, विभागीय उप आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, पुणे विभाग, पुणे यांनी ही कारवाई केली.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात खामगाव-पिंपळगाव रस्त्यालगत पवार फार्महाऊस शेजारी झाडाझुडपामध्ये लपवून ठेवलेला मद्यसाठा महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये जप्त करण्यात आला. या कारवाईत गोवा बनावटीच्या “अॅडोरियल व्हिस्की”च्या 750 मिली क्षमतेच्या 1284 सिलबंद बाटल्या (107 बॉक्स) असा एकूण 11,55,600 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
दि. 22 एप्रिल 2026 रोजी माढा तालुक्यातील उपळाई गाव परिसरात अवैध मद्यविक्री करणाऱ्या ढाब्यावर कारवाईसाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर काही ढाबेमालकांकडून हल्ला करण्यात आला होता. या घटनेत अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण होऊन ते जखमी झाले होते. त्यानंतर विभागीय उप आयुक्त, पुणे विभाग यांच्या आदेशानुसार सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध मद्यसाठा व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याअनुषंगाने सदरची कारवाई करण्यात आली.
या कारवाईदरम्यान घटनास्थळी आढळून आलेल्या इसमास अटक करण्यात आली असून जप्त मद्यसाठ्याबाबत त्याच्याकडून सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणात आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सदरची कारवाई निरीक्षक नरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक विराज माने, धीरज सस्ते, निनाद निकम, सहायक दुय्यम निरीक्षक अलिम शेख, जवान शशिकांत भट, राहुल तारळकर, प्रविण पुसावळे, हृतिक कोळपे तसेच वाहन चालक झिंगळे यांनी पार पाडली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक निनाद निकम करीत आहेत.
विभागीय भरारी पथक, पुणे विभाग यांनी अवैध मद्यविक्री करणारे ढाबे, गोडाऊन व संबंधित इसमांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 मधील कलम 93 अन्वये कठोर कारवाई व तडीपार मोहिम हाती घेतली आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या गोवा राज्यातील अथवा बनावट मद्यविक्रीची माहिती विभागास दिल्यास माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. अधिक माहितीसाठी व तक्रार नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक 18008333333 वर संपर्क साधण्याचे आवाहन निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक पुणे विभाग, पुणे नरेंद्र थोरात यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |