मळेवाड येथे तात्काळ 100 केव्ही ट्रान्सफॉर्मर बसवण्याची मागणी

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 28 May 2026 | 👁 213 Views
मळेवाड येथे तात्काळ 100 केव्ही ट्रान्सफॉर्मर बसवण्याची मागणी
पं. स. सदस्या धनश्री मराठे यांचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन
सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड गावात कमी क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरमुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून तात्काळ 100 केव्ही क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावा, अशी मागणी पंचायत समिती सदस्या धनश्री हेमंत मराठे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता, कुडाळ यांना निवेदन सादर केले.
मळेवाड गावातील मसूरकरवाडी, नाईकवाडी, हेदुलवाडी या भागांमध्ये एकाच लाईनवर वीजपुरवठा होत असल्याने कमी दाबाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. परिणामी घरगुती उपकरणे, शेती पंप तसेच व्यावसायिक उपकरणे पूर्ण क्षमतेने कार्यरत राहत नाहीत. ग्रामपंचायतीचा नळपाणी पुरवठा पंपही सुरळीत चालत नसल्याने नागरिकांना पाणीपुरवठा करताना ग्रामपंचायतीसमोर अडचणी निर्माण होत आहेत.
तसेच ग्रामपंचायत मळेवाड-कोंडुरे अंतर्गत सावळवाडी, केरकरवाडी, शिरसाटवाडी, चराटकरवाडी, मुरकरवाडी, परबवाडी आणि राणेवाडी परिसरातही कमी दाबामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या ठिकाणी सध्या असलेला 25 केव्ही क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बदलून तातडीने 100 केव्ही क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसवावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
कमी दाबामुळे वारंवार तक्रारी येत असून ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ लक्ष घालून सर्व वाड्यांतील वीज समस्या मार्गी लावाव्यात, अशी मागणी धनश्री मराठे यांनी केली आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |