ईश्वरपूर येथे श्री बिरदेव जन्मोत्सव उत्साहात संपन्न; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

👤 ईश्वरपुर प्रतिनिधी राहुल टिबे | 📅 07 May 2026 | 👁 344 Views
ईश्वरपूर येथे श्री बिरदेव जन्मोत्सव उत्साहात संपन्न; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
मंत्री कॉलनी येथील श्री बिरदेव मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री बिरदेव जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. सकाळी सहा वाजता पाळणा गायन करून पुष्प अर्पण करण्यात आले तसेच जन्मकाळ साजरा करण्यात आला. यावेळी धनगर समाजातील तसेच परिसरातील तमाम माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यानंतर सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाच्या तयारीला सुरुवात झाली. सायंकाळी सात वाजता श्रींची महाआरती संपन्न झाल्यानंतर महाप्रसादाला प्रारंभ करण्यात आला. ईश्वरपूर शहर व परिसरातील हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
सर्व समाज बांधवांनी अत्यंत उत्कृष्ट नियोजन करत कोणताही गडबड-गोंधळ न होता रात्री अकरा वाजेपर्यंत शांततेत महाप्रसाद कार्यक्रम पार पाडला. उपस्थित भाविकांनी संयोजनाचे कौतुक केले.
यावेळी बोलताना ईश्वरपूर धनगर समाजाचे प्रमुख श्री राहुल टिबे म्हणाले, “आमच्या चौथ्या पिढीपासून मंत्री कॉलनी येथे श्री बिरदेव मंदिर आहे. येथे वर्षभर दसरा, गुढीपाडवा यांसारखे विविध सण आणि धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. दरवर्षी सकाळी जन्मकाळ साजरा केला जातो आणि उन्हाच्या तीव्रतेमुळे सायंकाळी सातनंतर महाप्रसादाचे आयोजन केले जाते. महाप्रसादासाठी देणगी देणाऱ्या सर्व समाज बांधवांचे धनगर समाजाच्या वतीने मनःपूर्वक आभार.”
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ईश्वरपूर धनगर समाजातील सर्व बांधव व मित्रपरिवार यांनी परिश्रम घेतले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप | आषाढी एकादशीचे अनोखे कलादर्शन; तांदळाच्या दाण्यावर अवतरले पांडुरंग;रिया कांबळीच्या अद्वितीय कलेला सलाम.. | तासगावच्या दीडशे वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवाही ठरतोय जीर्णोद्धाराची गरज! ​तासगावच्या गुरुवार पेठेतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा समृद्ध इतिहास व धार्मिक परंपरा | मा. संजय काटकर (IAS) यांचा उपजिल्हा रुग्णालय, कवठेमहांकाळ येथे संवाद दौरा; ग्रामीण आरोग्य सेवांना गती देण्याचे निर्देश | जिल्हा सत्र,वरिष्ठ दिवाणी न्यायालयासाठी कवठे महांकाळ वकील संघटना आक्रमक.उपोषणाचा इशारा |