कणकवलीत अतिक्रमण हटाव मोहीम सुरुच - नगराध्यक्ष संदेश पारकर

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 14 June 2026 | 👁 242 Views
कणकवलीत अतिक्रमण हटाव मोहीम सुरुच - नगराध्यक्ष संदेश पारकर
नगरपंचायतीकडून शहरातील तसेच उड्डाणपुलाखालील जागेतील अतिक्रमणे हटविण्यासाठी सुरू करण्यात आलेली मोहीम कोणत्याही परिस्थितीत थांबविण्यात येणार नसून शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी प्रशासनाने कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार शहराचा नियोजनबद्ध विकास करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली.
नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी अतिक्रमण हटाव मोहिमेवर सविस्तर भूमिका मांडली. शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले असून त्यानुसार कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
उड्डाणपुलाखालील जागेत फळ, फुले व भाजी विक्रेत्यांना तात्पुरत्या स्वरूपात व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र त्या ठिकाणी स्टॉल, टपरी किंवा खाद्यपदार्थ विक्रीसाठी कोणालाही परवानगी देण्यात आलेली नसल्याचे पारकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे संबंधित विक्रेत्यांनी रविवारपर्यंत स्वतःहून अतिक्रमणे हटवावीत, अन्यथा नगरपंचायतीमार्फत कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांसाठी पर्यायी जागेचे नियोजन करण्याबाबत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन स्तरावर चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अतिक्रमण हटाव मोहिमेनंतरच शहरातील अतिक्रमणांमागील आर्थिक व्यवहार उघडकीस आले असून साडेनऊ लाखांचा हप्ता कोण घेतो हे आता स्पष्ट झाले आहे. असेही श्री. पारकर म्हणाले.
शहराच्या सौंदर्यासाठी वाहतूक आणि नागरिकांच्या सोयीसाठी अतिक्रमणमुक्त कणकवली घडविण्याचा निर्धार प्रशासनाने केला असून ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |