राजूर पाणीपुरवठा प्रश्नावर जनता दरबारात आमदार डॉ. किरण लहामटे यांचा संताप

👤 संकेत तुकाराम सानप मुंबई | 📅 08 June 2026 | 👁 137 Views
राजूर पाणीपुरवठा प्रश्नावर जनता दरबारात आमदार डॉ. किरण लहामटे यांचा संताप
अकोले तालुका प्रतिनिधी.राजूर येथे झालेल्या जनता दरबारात पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांच्या अन्यायाचा प्रश्न ऐरणीवर आला. राजूर शहरात स्वच्छता राखणे व नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी पार पाडणारे संजय पवार व विजय पवार या दोन कामगारांना कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता अचानक कामावरून कमी करण्यात आल्याची तक्रार आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासमोर मांडण्यात आली.
या दोन्ही कामगारांनी अनेक वर्षे राजूर शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी परिश्रम घेतले. विशेषतः विजय पवार हे दररोज ९० हून अधिक वॉल्व्ह फिरवून दिवसाआड पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी कार्यरत होते. मात्र त्यांना कामावरून दूर केल्यानंतर अनेक भागांत पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून काही ठिकाणी आठ-आठ दिवस पाणी मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
आमदार डॉ. किरण लहामटे यांनी सांगितले की, राजूरकरांना नियमित व स्वच्छ पाणी मिळावे यासाठी त्यांनी आपल्या निधीतून सुमारे १५ लाख रुपये खर्च करून स्टॅबिलायझर उपलब्ध करून दिले होते, जेणेकरून मोटारी वारंवार जळण्याचे प्रकार थांबतील. मात्र काही व्यक्तींकडून दादागिरीच्या माध्यमातून कामगारांना हटवून पाणीपुरवठा व्यवस्थेत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
राजूरमधील अनेक महिलांनीही विजय पवार यांनाच पुन्हा पाणीपुरवठ्याच्या कामावर ठेवण्याची मागणी केली असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच ग्रामपंचायतीच्या कारभारावर करण्यात आलेल्या आरोपांबाबतही पुरावे सादर करण्यात आले असून, केवळ बदनामी व दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा काहींचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले.
"राजूरमध्ये अराजकता निर्माण करण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. अन्यायग्रस्त कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि नागरिकांना नियमित पाणीपुरवठा मिळण्यासाठी आपण ठामपणे उभे आहोत," असे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी स्पष्ट केले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |