प्रत्येकाने सुदृढ आरोग्य राखणे ही काळाची गरज - सोनु सावंत

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 14 June 2026 | 👁 184 Views
प्रत्येकाने सुदृढ आरोग्य राखणे ही काळाची गरज -  सोनु सावंत
आरोग्य शिबिराचा ग्रामस्थांना मिळाला लाभ माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान व आशिये ग्रामपंचायतच्यावतीने आयोजित आरोग्य शिबिरात रक्त तपासणी 45 , एक्से 65 , ईसीजी 43 , नेत्र तपासणी 40 , ई संजीवनी तपासणी 24 एकूण बाह्यरुग्ण तपासणी 78 नागरिकांची करण्यात आली. त्याचबरोबर आयुष्मान कार्ड 35, वंदना कार्ड यासारख्या विविध शासकीय योजनांचे कार्ड विनामुल्य या शिबिरात काढण्यात आले. याशिबिरात विविध 217 प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत.
आपल्या जीवनात आरोग्य धनसंपदा असून सुदृढ शरीर असणे ही काळाची गरज बनली आहे.माणसाने कितीही पैसे मिळवले तरी शेवटी जर सुदृढ शरीर नसेल तर त्या पैशाची शुन्य किंमत असून त्याचा उपयोग घेता येत नाही. आशिये सरपंच महेश गुरव हे नेहमी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवतात. एखादा दुसरा माणूस उपक्रम करतो म्हणून आपण करुया , असे न करता आपल्या गावातील लोकांसाठी प्रामाणिकपणाने सेवेच्या भावनेतुन या आरोग्य शिबिराचे आयोजन महेश गुरव यांनी केले आहे. आशिये गाव छोटासा असूनही महेश गुरव यांनी खा.नारायण राणे , पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली वेगळ्या विकासाच्या उंचीवर नेऊन ठेवल्याचे प्रतिपादन उपसभापती सोनु सावंत यांनी केले.
आशिये येथे ग्रामपंचायत व माझ गाव आरोग्य संपन्न गाव अभियाना अंतर्गत आरोग्य शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जि.प. सदस्या सुप्रिया मेस्त्री , पं.स. सदस्य गुरुनाथ वर्देकर, सरपंच महेश गुरव , उपसरपंच संदीप जाधव, ग्रा.प.सदस्य अविराज मराठे , विशाखा गुरव, सत्यवान धुरी , प्रविण पावसकर , ग्रामपंचायत अधिकारी राकेश गोवळकर, मोतीराम कासले , माजी सरपंच प्रणाली बाणे,वैद्यकीय अधिकारी रुपाली वळंजू , आरोग्य सहाय्यक महेश आचरेकर, आरोग्य सहाय्यक मंगेश परब , रक्त तपासणीस योगेश सावंत, आरोग्य सहाय्यकसेवक चंद्रमणी कदम , सीएचओ ऐश्वर्या गावडे , नेत्र तपासणी मारुती सावंत, आरोग्य सहाय्यक देवयानी केसरकर , आशा सेविका गार्गी नेमळेकर, मिनल सावंत , परिचारिका प्राजक्ता जाधव , आशा सेविका नेहा लाड ,सोनल लोकरे, श्रीम.रावराणे , ग्रा.पं.कर्मचारी दुर्वा जाधव , सायली गुरव , रुचिता माणगांवकर , प्रकाश गुरव आदींसह वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.
जि.प.सदस्या सुप्रिया मेस्त्री म्हणाल्या , आशिये गावातील नागरिकांसाठी सरपंच महेश गुरव यांनी या आरोग्य शिबिराचे आयोजन केले. खरोखरच त्याबद्दल त्यांचे व त्यांच्या सहका-यांचे कौतुक आहे. जिल्हा परिषदच्या माध्यमातून या गावासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल. भविष्यात अशा उपक्रमांमध्ये माझा नेहमी सहभाग असेल.
प्रास्ताविकात महेश गुरव म्हणाले, आपल्या आशिये गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे महत्वाचे शिबिर आहे. आपली माणसे निरोगी राहावीत. गावातील नागरिकांना कुठलाही दुर्धर आजार होण्याच्या अगोदरच निदान झाले तर कुठल्याही आजारावर मात करता येते. कॅन्सर सारखे आजारही योग्य निदानामुळे बरे होवू शकतात. या शिबिरात नेत्र तपासणीत मोफत चष्मा व शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहे.
आशिये गावातील ग्रामस्थांनी गावात आरोग्य शिबिर आयोजित केल्याबद्दल सरपंच महेश गुरव यांचे आभार मानले.

Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |