वनगळी येथे महिलेसह कुटुंबीयांवर हल्ला; मंगळसूत्र हिसकावल्याची तक्रार

👤 अतुल सोनकांबळे इंदापूर | 📅 14 June 2026 | 👁 284 Views
वनगळी येथे महिलेसह कुटुंबीयांवर हल्ला; मंगळसूत्र हिसकावल्याची तक्रार
तालुक्यातील वनगळी येथे पोलीस पंचनामा सुरु असताना वाद घालून एकाने महिलेसह तिच्या कुटुंबीयांवर हल्ला करुन महिलेच्या गळ्यातील अर्धा तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना गुरुवारी ( दि.११) सायंकाळी घडली. महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपीवर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमनाथ नामदेव चव्हाण ( रा.वनगळी, ता.इंदापूर) असे आरोपीचे नाव आहे. अर्चना अतुल सोनकांबळे (वय ३६ वर्षे, रा.वनगळी) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे.
पोलीसांनी सांगितले की,अर्चना सोनकांबळे, त्यांचे पती अतुल सोनकांबळे व मुलगा आर्यन हे घरी असताना बावधन पोलीस ठाण्याच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक शितल गिरी व पोलीस कर्मचारी पंचनामा करण्यासाठी त्यांच्या घरी आले होते. त्यावेळी गावातील सोमनाथ नामदेव चव्हाण हा तेथे आला. त्याला निघून जाण्यास सांगितल्याने त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
वाद वाढल्यानंतर सोमनाथ चव्हाण याने अर्चना सोनकांबळे यांना थप्पड मारून दगडाने खांदा व पाठीवर मारहाण केली. तिला सोडवण्यासाठी आलेल्या मुलगा आर्यन याला लाथाबुक्क्यांनी तर पती अतुल सोनकांबळे यांना दगडाने मारून दुखापत केली व माझा भाऊ किरण बाळु चव्हाण हा जेल मधून सुटुन आल्यानंतर तुम्हाला बघुन घेऊ अशी धमकी दिली असे तक्रारीत नमूद आहे.
मारहाणीदरम्यान अर्चना सोनकांबळे यांच्या गळ्यातील अर्धा तोळ्याचे सोन्याचे मणीमंगळसूत्र हिसकावून घेतल्याचा आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे. घटनेनंतर डायल ११२ वर संपर्क साधून पोलीस मदत मागवण्यात आली. जखमींवर उपजिल्हा रुग्णालय, इंदापूर येथे उपचार करण्यात आले आहेत. इंदापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2026 असा असेल. | दर्शनाहून परतताना काळाचा घाला! विहिरीत कोसळलेल्या पिकअपने १४ भाविकांचा जीव घेतला; संपूर्ण गाव शोकसागरात | प्रेमिकेसोबत लॉजवर लपला, पण एलसीबीच्या जाळ्यात अडकला! | १५ जून जवळ आली की शाळेच्या आठवणी पुन्हा मनात दरवळतात – प्रसिद्ध अँकर प्रदीप अहिरे यांची भावनिक प्रतिक्रिया | आमदार प्रमोद जठार यांनी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा घेतला आढावा | नांदगाव तिठा उड्डाणपुलाखाली अखेर स्ट्रीट लाईटची व्यवस्था.. | ऐतिहासिक ​सावंतवाडी शहर आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार : ना. नितेश राणे | वनगळी येथे महिलेसह कुटुंबीयांवर हल्ला; मंगळसूत्र हिसकावल्याची तक्रार | कणकवलीत अतिक्रमण हटाव मोहीम सुरुच - नगराध्यक्ष संदेश पारकर | प्रत्येकाने सुदृढ आरोग्य राखणे ही काळाची गरज - सोनु सावंत |