शतप्रतिशत भाजपसह कोकणच्या विकासाला प्राधान्य‌ देणार - प्रमोद जठार

👤 वैभववाडी प्रतिनिधी - तुषार शिंगाडे | 📅 07 May 2026 | 👁 16 Views
शतप्रतिशत भाजपसह कोकणच्या विकासाला प्राधान्य‌ देणार - प्रमोद जठार
उरला सुरला बॅकलॉग सरकारचा दुवा बनून भरून काढेन माझी आमदारकी जुन्या नव्या कार्यकर्त्यांना समर्पित आ.प्रमोद जठार
आमदारकी ही भाजपच्या नव्या वजुन्या कार्यकर्त्यांना समर्पित असून नेत्यांच्या आशीर्वादाने जनहितार्थ काम करणार आहे. पुढची ६ वर्ष शतप्रतिशत भाजपसह कोकणच्या विकासाला प्राधान्य देत उरला सुरला बॅकलॉग सरकारचा दुवा बनून भरून काढेन, असा विश्वास भाजपचे विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केला. तसेच आमच्यात गट नाही, भाजप हाच आमचा गट असल्याचा दावाही त्यांनी केला. येथील भाजप कार्यालयात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. येथील भाजप मध्यवर्ती कार्यालयात सावंतवाडीतील पदाधिकाऱ्यांकडून आम. जठार यांचे जंगी स्वागत करण्यात आले. हार, पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी आम. जठार म्हणाले, देशात भाजपला कार्यकर्त्यांच्या ताकदीवर यश मिळालं असून १०० वर्षांच्या त्यागाचे हे फळ आहे. माझ्या पदाचा फायदा हा पक्षाला व जनतेला करून देण्यासाठी माझा भर आहे. मुख्यमंत्री, भाजप प्रदेशाध्यक्ष, खासदार, पालकमंत्री व जिल्हाध्यक्ष यांच्या माध्यमातून पालघर ते सिंधुदुर्गचा समन्वयक म्हणून मी काम करेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, दोन ठिकाणी स्वागता वरून छेडलं असता ते म्हणाले, आमच्यात गट नाहीत, भाजप हाच आमचा गट आहे. राष्ट्र प्रथम हा विचार जपणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. कोकणातील रोजगारावर आमचा भर असून इथल्या तरूण- तरुणी बाहेर जाता नयेत यासाठी माझा पहिला प्रयत्न राहील, येत्या काळात कोकणात रोजगार उभा राहिलेला दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच सगळेच भाजपात येऊन जयघोष करताना दिसतील असाही टोला विरोधकांना हाणला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, भाजप सरचिटणीस महेश सारंग, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, युवराज लखमराजे भोंसले, शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर, मनोज नाईक, आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, अॅड. परिमल नाईक, माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, रवी मडगावकर, नीलम नाईक, सुनिता पेडणेकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप | आषाढी एकादशीचे अनोखे कलादर्शन; तांदळाच्या दाण्यावर अवतरले पांडुरंग;रिया कांबळीच्या अद्वितीय कलेला सलाम.. | तासगावच्या दीडशे वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवाही ठरतोय जीर्णोद्धाराची गरज! ​तासगावच्या गुरुवार पेठेतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा समृद्ध इतिहास व धार्मिक परंपरा | मा. संजय काटकर (IAS) यांचा उपजिल्हा रुग्णालय, कवठेमहांकाळ येथे संवाद दौरा; ग्रामीण आरोग्य सेवांना गती देण्याचे निर्देश | जिल्हा सत्र,वरिष्ठ दिवाणी न्यायालयासाठी कवठे महांकाळ वकील संघटना आक्रमक.उपोषणाचा इशारा |