पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त महामार्ग दुतर्फा करणार वृक्ष लागवड

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 18 June 2026 | 👁 196 Views
पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त महामार्ग दुतर्फा करणार वृक्ष लागवड
सरपंच संदीप सावंत आणि वागदे ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजन
पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सरपंच संदीप सावंत आणि वागदे ग्रामपंचायतीच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २३ जून रोजी स.१० वा. वागदे येथे मुंबई - गोवा महामार्गाच्या दुतर्फा सुमारे ६ किमी. परिसरात (गडनदी पुल ते डंगळवाडी) सावली देणाऱ्या झाडांची लागवड केली जाणार असल्याची माहिती वागदे सरपंच संदीप सावंत यांनी दिली. ते म्हणाले, महामार्ग चौपदरीकरणावेळी झाडे तोडण्यात आली, त्यामुळे महामार्गावर सावलीसाठी एकही झाड नाही. म्हणूनच आम्ही महामार्गावर दुतर्फा सावली देणारी झाडे लावणार आहोत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व व पुढील पिढ्यांना हिरवागार परिसर दिसावा यासाठी प्रत्येकाने 'एक तरी झाड लावावे' असा संदेश यातून आम्ही देणार आहोत. २३ जून रोजी स. १० वा. गडनदी पुलापासून या वृक्षारोपणास प्रारंभ होणार आहे. या उपक्रमात सर्व ग्रामस्थांनी, पर्यावरण प्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन संदीप सावंत यांनी केले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |