शिव व्यापार व रोजगार सेनेच्या कोकण विभाग संपर्क प्रमुखपदी शंकर पार्सेकर यांची नियुक्ती

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 18 June 2026 | 👁 297 Views
शिव व्यापार व रोजगार सेनेच्या कोकण विभाग संपर्क प्रमुखपदी शंकर पार्सेकर यांची नियुक्ती
हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी हिंदुत्ववादी विचारांचा वारसा तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या जनसेवेच्या प्रेरणेतून आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या शिवसेनेची अंगीकृत संघटना शिव व्यापार व रोजगार सेना यांच्या वतीने श्री. शंकर पांडुरंग पार्सेकर यांची कोकण विभाग संपर्क प्रमुख या महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

श्री. पार्सेकर यांचे संघटन कौशल्य, समाजाशी असलेली घट्ट नाळ, कार्यकर्त्यांप्रती असलेली आत्मीयता तसेच जनतेच्या प्रश्नांसाठी झटण्याची जिद्द लक्षात घेऊन ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. ते ही जबाबदारी पूर्ण प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कर्तव्यभावनेने पार पाडतील, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

श्री. पार्सेकर यांच्या माध्यमातून शिवसेनेची विचारधारा अधिक प्रभावीपणे घराघरांत पोहोचेल, बेरोजगार युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, व्यापारी वर्गाच्या समस्या सोडविण्यासाठी संघटना अधिक सक्षमपणे कार्य करेल तसेच समाजहिताची विविध कामे अधिक वेगाने पुढे जातील, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

ही नियुक्तीपत्रिका संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष श्री. शैलेश आर. जायस्वाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी संस्थापक अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर सहदेव सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |