देवगड हायस्कूलमध्ये छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात संपन्न

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 26 June 2026 | 👁 132 Views
देवगड हायस्कूलमध्ये छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात संपन्न
म. ग. हायस्कूल, देवगड येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी प्रमुख वक्ते शामू जंगले यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेत विविध सामाजिक समस्या, मागासवर्गीय आरक्षण, सामाजिक न्याय आणि
समाजसुधारणेतील त्यांच्या योगदानाविषयी मार्गदर्शन केले. तसेच पर्यवेक्षिका सौ. निशा दहिबावकर यांनी शाहू महाराजांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करत शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.या वेळी कु.स्पर्श कदम, कु. वैभव जंगले , वेदांत राऊळ व कु. स्वरा शिंद या विद्यार्थ्यांनीही छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांवर आधारित मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शामू जंगले यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप | "आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदीचे भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन" | सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न. | टाकेवाडीत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात; विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला | गोंदवलेत शाळा व दवाखाना परिसर कचरामय; ग्रामस्थांचा संताप | तोरसोळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण गोठ्यात घुसून मध्यरात्री केला हल्ला; वन विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी | मानपाडा-वाघाडी व सोनाळे खुबरोखपाडा अंधारात; १७ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा | हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव |