त्रिंबक येथे १५ मे रोजी मोफत वैद्यकीय महाआरोग्य शिबिर

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 12 May 2026 | 👁 178 Views
त्रिंबक येथे १५ मे रोजी मोफत वैद्यकीय महाआरोग्य शिबिर
जागृत उन्नती मंडळ त्रिंबक, मुंबई व सिंपन प्रतिष्ठान मुंबई यांचे आयोजन
मालवण तालुक्यातील त्रिंबक येथील जनता विद्यामंदिर त्रिंबक हायस्कूल येथे शुक्रवार १५ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत मोफत वैद्यकीय महाआरोग्य शिबिराचे आयोजन जागृत उन्नती मंडळ त्रिंबक, मुंबई व सिंपन प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे. या शिबिरात मुंबई व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत डॉक्टर रूग्णांची तपासणी, निदान, मोफत औषधोपचार आणि चष्मा वाटप करणार आहेत. रूग्ण सेवा हिच ईश्वर सेवा या उदात्त हेतूने या वैद्यकीय महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात नामवंत डॉक्टरांकडून सर्व रूग्णांची तपासणी,निदान व औषधोपचार, रक्तदाब व रक्तातील साखर तपासणे, मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप, मोफत औषधांचे वाटप, गर्भाशय कर्करोगाच्या ( cervical cancer) निदानासाठी स्त्रियांची महिला डॉक्टरांनकडून तपासणी, संधीवात आणि मणक्यांच्या आजारांवरील उपचारांसाठी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध, बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांकडून बाल रूग्णांची तपासणी व उपचार केले जाणार आहेत तरी त्रिंबक गाव आणि पंचक्रोशीतील जास्तीत जास्त रूग्णांनानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक डॉ. सिध्देश सकपाळ, ग्रामपंचायत त्रिंबक, जागृत उन्नती मंडळ त्रिंबक, मुंबई व सिंपन प्रतिष्ठान मुंबई, रॉयल मालवणी, सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |