जव्हारची आदिवासी कन्या खाकी वर्दीत : सारसूनच्या पुनम जंगलीची मीरा-भाईंदर पोलीस शिपाईपदी भरारी, क ठाकूर समाजात आनंदोत्सव

👤 जव्हार-जितेंद्र मोरघा | 📅 04 May 2026 | 👁 152 Views
जव्हारची आदिवासी कन्या खाकी वर्दीत : सारसूनच्या पुनम जंगलीची मीरा-भाईंदर पोलीस शिपाईपदी भरारी, क ठाकूर समाजात आनंदोत्सव
मुलगी शिकली, प्रगती झाली या उक्तीला सार्थ ठरवत जव्हार तालुक्यातील सारसून गावच्या पुनम लक्ष्मण जंगली हिने मीरा-भाईंदर पोलीस दलात शिपाईपदी निवड होऊन संपूर्ण आदिवासी क ठाकूर समाजाची मान अभिमानाने उंचावली आहे.
जंगली कुटुंबातील पुनम हिचे वडील लक्ष्मण जंगली हे शेतमजूर आहेत. घरची परिस्थिती बेताची असतानाही पुनमने जिद्द सोडली नाही. प्राथमिक शिक्षण घेऊन तिने पोलीस भरतीची तयारी सुरू केली. पहाटे उठून धावणे, स्वतः अभ्यास करणे आणि घरकाम सांभाळून तिने हे यश खेचून आणले आहे.
पुनमच्या निवडीची बातमी कळताच सारसूनसह संपूर्ण जव्हार पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण पसरले. आदिवासी क ठाकूर समाज संघटना, जव्हार च्या वतीने पुनमचे अभिनंदन करण्यात आले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप | आषाढी एकादशीचे अनोखे कलादर्शन; तांदळाच्या दाण्यावर अवतरले पांडुरंग;रिया कांबळीच्या अद्वितीय कलेला सलाम.. | तासगावच्या दीडशे वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवाही ठरतोय जीर्णोद्धाराची गरज! ​तासगावच्या गुरुवार पेठेतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा समृद्ध इतिहास व धार्मिक परंपरा | मा. संजय काटकर (IAS) यांचा उपजिल्हा रुग्णालय, कवठेमहांकाळ येथे संवाद दौरा; ग्रामीण आरोग्य सेवांना गती देण्याचे निर्देश | जिल्हा सत्र,वरिष्ठ दिवाणी न्यायालयासाठी कवठे महांकाळ वकील संघटना आक्रमक.उपोषणाचा इशारा |