कळसुली येथे नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 18 June 2026 | 👁 206 Views
कळसुली येथे नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन
*ग्रामस्थांनी कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा- सरपंच सचिन पारधीये यांचे आवाहन
महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेश राणे यांच्या २३ जून २०२६ रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त कळसुली ग्रामपंचायत सभागृह येथे १९ जून २०२६ रोजी विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमांतर्गत नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून, कळसुली गावातील महिला बचत गटांना हळदीची रोपे वाटप करण्यात येणार आहेत. तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात येणार असून, गावातील दिव्यांग व्यक्तींना छत्र्यांचे वाटपही करण्यात येणार आहे.

सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा तसेच मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कळसुली ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. सचिन पुनाजी पारधीये यांनी केले आहे.

दरम्यान, हे सर्व कार्यक्रम कळसुली भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आले असून, वाढदिवसानिमित्त समाजहिताचे उपक्रम राबविण्याचा उद्देश असल्याचे सरपंच सचिन पारधीये यांनी सांगितले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |