अदानी-अंबानींना ठेका द्या, पण रेल्वेचा बोर्ड तरी बदला!" पुणे-कोल्हापूर स्पेशलमुळे प्रवाशांचा रोजचा गोंधळ राजू शेट्टी

👤 बापूसाहेब नामदास | 📅 12 June 2026 | 👁 160 Views
अदानी-अंबानींना ठेका द्या, पण रेल्वेचा बोर्ड तरी बदला!" पुणे-कोल्हापूर स्पेशलमुळे प्रवाशांचा रोजचा गोंधळ राजू शेट्टी
पुणे-कोल्हापूर दरम्यान रात्री ९.४० वाजता धावणाऱ्या विशेष रेल्वेमुळे प्रवाशांचा मोठ्या प्रमाणावर गोंधळ होत असल्याची तक्रार समोर आली आहे. गोंदिया-कोल्हापूर या गाडीचे डबे पुणे-कोल्हापूर स्पेशलसाठी जोडले जात असल्याने गाडीवरील बोर्ड बदलले जात नाहीत. परिणामी नागपूरकडे जाणाऱ्या महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या अनेक प्रवाशांची दिशाभूल होत आहे. पुणे स्थानकावर पुणे-कोल्हापूर स्पेशल आणि महाराष्ट्र एक्स्प्रेस यांच्या वेळेत अवघे २० मिनिटांचे अंतर असल्याने अनेक प्रवासी चुकीने कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाडीत चढतात. पुढे सासवड रोड किंवा जेजुरी येथे चूक लक्षात आल्यानंतर ते उतरतात; मात्र तोपर्यंत महाराष्ट्र एक्स्प्रेस पुणे स्थानक सोडून गेलेली असते. त्यामुळे दररोज शेकडो प्रवाशांचा खोळंबा होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे तिकीट तपासनीस (टीसी) देखील त्रस्त झाले असून, प्रवाशांकडून वारंवार होणाऱ्या तक्रारींना त्यांनाही सामोरे जावे लागत आहे. संबंधित समस्येबाबत दोन महिन्यांपूर्वी रेल्वे प्रशासनाला सूचना देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या फेसबुक वॉलवरून उपरोधिक शब्दांत संताप व्यक्त करण्यात आला आहे. "रेल्वे प्रशासनाकडे बोर्ड बदलण्यासाठी कर्मचारी नसतील, तर अदानी किंवा अंबानी यांना ठेका द्या; पण गाडीचे बोर्ड दररोज बदलले गेले पाहिजेत," अशी टीका करण्यात आली आहे.
प्रवाशांच्या मते, केवळ योग्य आणि स्पष्ट बोर्ड लावल्यास हा गोंधळ सहज टाळता येऊ शकतो. आता रेल्वे प्रशासन याकडे कितपत गांभीर्याने पाहते, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |