धामोरी न्यू इंग्लिश स्कूलचा एस.एस.सी. निकाल 95.29 टक्के कायम

👤 कोपरगाव प्रतिनिधी : अथर्व वाणी | 📅 08 May 2026 | 👁 208 Views
धामोरी न्यू इंग्लिश स्कूलचा एस.एस.सी. निकाल 95.29 टक्के कायम
उज्ज्वल यशाची परंपरा
कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील न्यू इंग्लिश स्कूल, धामोरी या विद्यालयाने इयत्ता दहावीच्या (एस.एस.सी.) मार्च 2026 बोर्ड परीक्षेत 95.29 टक्के इतका उल्लेखनीय निकाल मिळवत यशाची परंपरा पुन्हा एकदा कायम राखली आहे. ग्रामीण भागातही गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्तबद्ध वातावरण आणि शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन यामुळे हे यश संपादन झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या परीक्षेत विद्यालयातील एकूण 81 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी 18 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य (Distinction), 45 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी (First Class), 15 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी (Second Class) तर 3 विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण श्रेणी (Pass Class) मिळवत विद्यालयाची शैक्षणिक पताका उंचावली.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे पालकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली असून संपूर्ण धामोरी गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे. विद्यालयातील शिक्षकांनी वर्षभर घेतलेले परिश्रम, अतिरिक्त तासिका, नियमित सराव चाचण्या, वैयक्तिक मार्गदर्शन तसेच विद्यार्थ्यांच्या अडचणींचे वेळोवेळी केलेले निराकरण यामुळे हा उल्लेखनीय निकाल शक्य झाला.
मुख्याध्यापकांच्या सक्षम नेतृत्वाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकजुटीने कार्य करत विद्यार्थ्यांना उत्तम शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून दिले. या यशाबद्दल स्थानिक सल्लागार समिती तसेच न्यू इंग्लिश स्कूल धामोरीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तसेच विद्यालयाने सातत्याने 95 ते 100 टक्क्यांच्या दरम्यान निकालाची परंपरा कायम राखल्याबद्दल मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
धामोरी गावाच्या शैक्षणिक इतिहासात या निकालामुळे आणखी एक सुवर्ण अध्याय जोडला गेला असून आगामी काळातही विद्यालय अशीच यशस्वी कामगिरी करत राहील, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |