युवासेना प्रमुख आ. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळात ५००० वृक्ष लागवड मोहिमेस सुरुवात

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 14 June 2026 | 👁 142 Views
युवासेना प्रमुख आ. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळात ५००० वृक्ष लागवड मोहिमेस सुरुवात
मा.आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाला शुभारंभ युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या पुढाकाराने शिवसेना, युवासेनेचे आयोजन
युवासेना प्रमुख,आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेना कुडाळ यांच्या वतीने आणि युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या पुढाकाराने कुडाळ शहरात ५००० झाडांची भव्य वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत आहे. याचा शुभारंभ माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या हस्ते श्री महालक्ष्मी मंदिर येथे वृक्षारोपण करून करण्यात आला. यामध्ये बेल, आवळा, जरूळ, करंज, महोगनी, शेवगा, बहवा, चिंच, कुसुमी, कांचन, पळस यांसारखी झाडे लावण्यात येत आहेत. कुडाळ शहरातील भूजल पातळी वाढवण्यासाठी आणि वाढते प्रदूषण रोखण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याप्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख, नगरसेवक मंदार शिरसाट, शिवसेना तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, युवतीसेना जिल्हाप्रमुख नीनाक्षी शिंदे, जि. प. सदस्य गंगाराम सडवेलकर, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, कुडाळ संपर्कप्रमुख अतुल बंगे, युवासेना उपतालुकाप्रमुख स्वप्निल शिंदे, उपशहर प्रमुख गुरु गडकर, शहर निरीक्षक सुशिल चिंदरकर,युवासेना शहर समन्वयक अमित राणे,उपशहर प्रमुख शैलेश काळप, शाखाप्रमुख पप्या धुरी, संतोष अडुळकर, विनय पालकर, केदार काळप, महेश राहुल, प्रकाश कांबळे, हर्षद काळप, संजय बोभाटे, महेश कांबळे, जेष्ठ नागरिक भाऊ पाटणकर, प्रथमेश राणे, सतीश कुडाळकर, नितीन सावंत, वकील शिवप्रसाद सामंत व शिवसैनिक उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |