*कोळगावात महात्मा फुले स्मारकासाठी जागा द्या ग्रामस्थांचा इशारा*

👤 शुभम सुराणा जळगाव | 📅 13 October 2026 | 👁 7 Views
*कोळगावात महात्मा फुले स्मारकासाठी जागा द्या ग्रामस्थांचा इशारा*
भडगाव, प्रतिनिधी : कोळगाव येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे स्मारक उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीवर २५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत लेखी निर्णय घेऊन प्रत्यक्ष कार्यवाही करावी, अन्यथा २६ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

कोळगाव येथे महात्मा फुले यांचे स्मारक उभारण्यासाठी जागा निश्चित करण्याबाबत १४ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत गणपती मंदिराजवळील जागेबाबत चर्चा झाली होती. मात्र, या चर्चेनंतरही अद्याप अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. स्मारकाच्या जागेचा प्रश्न मार्गी लावून ग्रामपंचायतीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

२५ ऑक्टोबरपर्यंत निर्णय घेण्याची मागणी

महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्मारक उभारणे आवश्यक असल्याची भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने या मागणीची तातडीने दखल घेऊन २५ ऑक्टोबरपर्यंत जागेबाबत लेखी निर्णय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निर्धारित मुदतीत निर्णय न झाल्यास २६ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिल्याने आता ग्रामपंचायत प्रशासन याबाबत काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे..
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
*कोळगावात महात्मा फुले स्मारकासाठी जागा द्या ग्रामस्थांचा इशारा* | तहसीलदार अतुल पाटोळे यांची विभागीय चौकशी करा | *लग्नाला अवघे ५ महिने, नवविवाहित दाम्पत्याची तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या!* | शिरोशीतील कातकरीपाडा व काकडमाळ येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप | वाडा प्रभाग क्रमांक ११ मध्ये ‘आपली नगरसेविका आपल्या दारी’ अभियान नगरसेविका सौ. सविता वनगा नागरिकांच्या समस्या जाणून घेणार | सारसून येथे आठवडी बाजार समितीचा भव्य आठवडी बाजार | भडगावात लहान मुलाच्या अपहरणाचा डाव फसला; टू व्हीलर वर आले होते दोन संशयित पालकांना सतर्कतेचे आवाहन | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास | सिद्धी सूर्यवंशीची राज्य अजिंक्यपद कबड्डी निवड चाचणीसाठी निवड | तासगाव तालुक्यात ‘सेवा सेतू’चे भव्य शिबिर; निमणी येथे गुरुवारी आयोजन : तहसीलदार अतुल पाटोळे. |