शाळेची सुट्टी निसर्गासाठी; मणेराजूरीच्या बालचमूंकडून शेषागिरी पर्वतावर (शेकोबा डोंगर ) हरितक्रांती!

👤 संतोष एडके तासगाव | 📅 09 August 2026 | 👁 7 Views
शाळेची सुट्टी निसर्गासाठी; मणेराजूरीच्या बालचमूंकडून शेषागिरी पर्वतावर (शेकोबा डोंगर ) हरितक्रांती!


शाळेच्या रविवारच्या सुट्टीचा दिवस मौजमजेसाठी न घालवता मणेराजूरीतील सुमारे पन्नास -साठ बालचमूंनी तो निसर्ग संवर्धनासाठी अर्पण करत एक प्रेरणादायी आदर्श घालून दिला. शेषागिरी पर्वत (शेकोबा डोंगर) येथे जाणे -येणेच्या मार्गावर करणेत आलेल्या वृक्षारोपण अभियानात सुमारे ५०० विविध प्रकारच्या वृक्षांची रोपे आणि २ हजारांहून अधिक बियांची लागवड करण्यात आली.
परिसरातील वाढती वृक्षतोड, वाढते तापमान आणि पर्यावरणाचा ढासळणारा समतोल लक्षात घेऊन हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यापूर्वी करण्यात आलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत बालक, युवक, ग्रामस्थ आणि निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
या अभियानाचे नियोजन राजेंद्र जमदाडे यांनी केले. राजकुमार तोडकर यांनी ट्रॅक्टर उपलब्ध करून विशेष सहकार्य केले, तर ग्रामपंचायत मणेराजुरीने वृक्षांची रोपे उपलब्ध करून दिली. याशिवाय युवकांनी व ग्रामस्थांनी स्वतः रोपे व विविध प्रकारच्या बिया आणून उपक्रमात मोलाचे योगदान दिले.
या वृक्षारोपण मोहिमेत ऋषी जमदाडे, आयुष चव्हाण, प्रणव चव्हाण, प्रणित जाधव, हर्ष चव्हाण, संग्राम चव्हाण, देवांश जाधव, आयुष लोंढे, अर्णव लोंढे, श्लोक जाधव, आदेश कुंभार, विहान पवार, अथर्व जमदाडे, आयुष जमदाडे, ओम कलोणे, श्रेयश करगणे, सर्वेश लांडगे, रणवीर जमदाडे, दर्शन बागलकर आणि आकाश बागलकर यांच्यासह अनेकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
वृक्षारोपणानंतर या रोपांचे संगोपन करण्याचाही संकल्प करण्यात आला. लहान वयात पर्यावरणाबद्दलची सामाजिक जाणीव जपत बालचमूंनी दिलेला हा हरित संदेश सर्वासाठी प्रेरणादायी ठरला असून, त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.



Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
शाळेची सुट्टी निसर्गासाठी; मणेराजूरीच्या बालचमूंकडून शेषागिरी पर्वतावर (शेकोबा डोंगर ) हरितक्रांती! | पाटगावाव ( मिरज ) खून प्रकरणातील तीन आरोपी १२ तासात पोलिसांच्या जाळ्यात | तासगावात 9ऑगस्ट क्रांतीदिन उत्साहात साजरा | हक्कांच्या संघर्षासोबत समाजविकासाची नवी वाट; ‘मेंढपाळ आर्मी’ची उल्लेखनीय वाटचाल | महेश नार्वेकर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त कणकवलीत सफाई कामगारांना धान्य वाटप | कणकवलीत १६ ऑगस्टला सम्यक साहित्य संसदेच्या पुरस्कारांचे वितरण | 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी हीच अण्णासाहेबांसाठी लाख मोलाची शुभेच्छा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | " दहीहंडी पथकातील गोविंदांसाठी 10 लाखांचे विमाकवच!" | महाराष्ट्राच्या शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनात डॉ. बापूजी साळुंखे यांचे योगदान महत्त्वाचे : प्रा. सी. वाय. मानेपाटील | सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तांची मुळदे येथील मत्स्य संशोधन व संवर्धन प्रकल्पास भेट* |