“जनतेची अडवणूक खपवून घेतली जाणार नाही” — वडगाव पान आर.टी.ओ. कॅम्पमध्ये प्रशासनाला कडक सूचना आमदार अमोल खताळ पाटील

👤 संकेत तुकाराम सानप ( मुंबई मंत्रालय) | 📅 20 May 2026 | 👁 303 Views
“जनतेची अडवणूक खपवून घेतली जाणार नाही” — वडगाव पान आर.टी.ओ. कॅम्पमध्ये प्रशासनाला कडक सूचना आमदार अमोल खताळ पाटील
वडगाव पान येथे आयोजित करण्यात आलेल्या आर.टी.ओ. कॅम्पला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी करण्यात आली. यावेळी कॅम्पमध्ये उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत सर्वसामान्य नागरिकांची कोणत्याही प्रकारची अडवणूक होणार नाही, याची विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तसेच नागरिकांची सर्व कामे पारदर्शक, जलद व तत्परतेने पूर्ण करण्यात यावीत, असे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. नागरिकांना वेळेत सेवा मिळणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असून, जनतेची गैरसोय अजिबात सहन केली जाणार नाही, असा इशाराही यावेळी आमदार अमोल खताळ पाटील यांनी अधिकारी वर्गाला दिला
आर.टी.ओ. कॅम्पमध्ये येणाऱ्या नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आणि कामकाजात कोणताही विलंब होऊ न देणे यावर भर देण्यात आला. यावेळी अनेक नागरिकांनी कॅम्पच्या माध्यमातून होत असलेल्या सोयीबद्दल समाधान व्यक्त केले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |