महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकरण मतदार संघ दिववार्षिक निवडणूक 2026.... सर्व राजकीय पक्ष व शासकीय यंत्रणांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे - जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस. कार्तिकेयन

👤 अतुल फसाले | 📅 20 May 2026 | 👁 209 Views
महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकरण मतदार संघ दिववार्षिक निवडणूक 2026.... सर्व राजकीय पक्ष व शासकीय यंत्रणांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे                                    - जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस. कार्तिकेयन
सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर, 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी होणार


सोलापूर,(ज‍िमाका) द‍ि. 20 : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 18 मे 2026 रोजी महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्याच अनुषंगाने त्या दिवसापासून सोलापूर जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. ही आचारसंहिता लोकसभा व विधानसभा निवडणूक प्रमाणे असणार आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष तसेच शासकीय यंत्रणांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित राजकीय पक्ष प्रतिनिधी तसेच शासकीय यंत्रणाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कार्तिकेयन मार्गदर्शन करत होते. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी किरण सुरवसे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, जिल्हा प्रशासन अधिकारी योगेश डोके तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन म्हणाले की, निवडणूक अधिसूचना प्रसिद्धी 25 मे 2026, नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 1 जून, नामनिर्देशन छाननी 2 जून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 4 जून, मतदान दिनांक 18 जून 2026 (गुरुवार) सकाळी 8 ते दुपारी 4
तर मतमोजणी 22 जून रोजी होणार असून
निवडणूक पूर्ण होण्याची अंतिम तारीख 25 जून 2026 आहे.
या निवडणुकीत एकूण 19 स्थानिक संस्था सहभागी होत असून, त्यात जिल्हा परिषद, सोलापूर महापालिका तसेच 17 नगरपरिषद व नगरपंचायतांचा समावेश आहे. एकूण मतदारसंख्या 616 असून, त्यात 544 सामान्य मतदार, 49 नामनिर्देशित व 23 अध्यक्षीय(पंचायत समिती सभापती, नगराध्यक्ष) मतदारांचा समावेश आहे. नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी नवीन जिल्हाधिकारी कार्यालयातील कलेक्टर चेंबर निश्चित करण्यात आले आहे. अर्ज दाखल करण्याची वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 अशी राहणार असून, अर्ज शुल्क 100 रुपये आहे. खुल्या गटासाठी ठेव रक्कम 10 हजार तर अनुसूचित जाती-जमातीसाठी 5 हजार रुपये आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिली.
मतदानासाठी एकूण 6 मतदान केंद्रे प्रस्तावित असून ती उपविभागीय अधिकारी स्तरावर उभारण्यात येणार आहेत. मतमोजणीचे केंद्र नियोजन भवन, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे राहील. आज सायंकाळपर्यंत मतदार यादी फायनल करून सर्व राजकीय पक्ष यांना देण्यात येतील तसेच तहसील कार्यालय गटविकास अधिकारी कार्यालय उपविभागीय अधिकारी कार्यालय दर्शनी भागात ठेवण्यात येतील. ही निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असल्याचेही श्री. कार्तिकेयन यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातील अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवडणुकीदरम्यान आचारसंहिता 18 मे ते 25 जून 2026 या कालावधीत लागू राहणार असून, निधीवाटप, धोरणात्मक निर्णय, प्रचार साहित्य, पोस्टर-बॅनर यावर निर्बंध असतील. तसेच प्रत्येक तालुक्यात FST, SST व VST अशा तीन स्वतंत्र पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हे निवडणूक निर्णय अधिकारी असतील तर निवासी उपजिल्हाधिकारी हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असतील, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी किरण सुरवसे यांनी दिली.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |