कोल्हापूर | प्रतिनिधी
"जोतिबाच्या नावानं चांगभलं!" या जयघोषात आमदार अमोल खताळ पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील वाडी रत्नागिरी येथे विराजमान दख्खनचा राजा श्री जोतिबा यांचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी आमदार खताळ पाटील यांनी श्री जोतिबाच्या चरणी राज्यातील बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी, उत्तम आरोग्यासाठी, भरघोस पीक, सामाजिक ऐक्य आणि सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली. मंदिर परिसरात भक्तिमय वातावरणात दर्शन घेत त्यांनी देवस्थानाच्या परंपरेचा गौरव केला.
दर्शनानंतर श्री केदारलिंग/जोतिबा देवस्थान यांच्या वतीने आमदार अमोल खताळ पाटील यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या सन्मानाबद्दल त्यांनी देवस्थान प्रशासन व सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
यावेळी उपस्थित भाविकांनी "जोतिबाच्या नावानं चांगभलं!" असा जयघोष करत भक्तिमय वातावरण अनुभवले.