नाझरेचे सरपंच विजय सरगर यांच्या कार्यकाळात सरकारी योजना प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचल्या - शिक्षक नेते अशोक पाटील

👤 अतुल फसाले | 📅 24 May 2026 | 👁 379 Views
नाझरेचे सरपंच विजय सरगर यांच्या कार्यकाळात सरकारी योजना प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचल्या - शिक्षक नेते अशोक पाटील
सरपंच विजय सरगर यांच्या कार्यकाळात सरकारी योजना प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचल्या - शिक्षक नेते अशोक पाटील

सोलापूर : शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे अधिकारी म्हणून विजय सरगर यांनी आपल्या कार्यकाळात वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या नियोजनबद्ध कामकाजामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना अनेक सरकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळाला असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

विजय सरगर यांनी कार्यकाळात प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यातील दरी कमी करण्यावर विशेष भर दिला. शासनाच्या योजना केवळ कागदावर न राहता त्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी त्यांनी विविध विभागांशी समन्वय साधून प्रभावी अंमलबजावणी केली. शेतकरी, महिला बचत गट, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच बेरोजगार युवकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती गावोगावी पोहोचविण्याचे काम करण्यात आले.

त्यांच्या कामकाजातील पारदर्शकता, तत्परता आणि लोकाभिमुख दृष्टिकोनामुळे नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला. विविध सामाजिक संघटना व नागरिकांनीही विजय सरगर यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले असून, त्यांच्या कार्यकाळात अनेक विकासात्मक उपक्रमांना गती मिळाल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |