आमदार प्रमोद जठार यांनी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा घेतला आढावा

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 14 June 2026 | 👁 255 Views
आमदार प्रमोद जठार यांनी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा घेतला आढावा
आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्य मंत्री यांची भेट घेऊन लवकरच प्रलंबित समस्या मार्गी लावण्याचे दिले आश्वासन
रत्नागिरी - आमदार प्रमोद जठार यांनी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात सदिच्छा भेट देऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी डॉ.जयप्रसाद रामानंद यांनी आमदार जठार साहेब यांचाजवळ जिल्हा रुग्णालयातील समस्या मांडल्या. यामध्ये रुग्णायलातील वैद्यकीय 80% पदे रिक्त असल्यामुळे रुग्णांना सेवा देण्यात येणाऱ्या अडचणी त्याचबरोबर आता जिल्हा रुग्णायलातील नर्सेस कमी करत आहेत, नर्सेस नियुक्ती करताना त्यांना CET अनिवार्य नको, GNM केलेल्या विद्यार्थींना प्रथम प्राधान्य दिले पाहिजे, कंत्राती पद्धतीने विशेष स्टाफ भरती करावा, MBBS डॉ यांची नियुक्ती करावी, भुलतज्ञ, ग्लायकोलॉजिस्ट यांची नेमणूक करावी अश्या विविध मागण्या यावेळी आमदार प्रमोद जठार यांच्याजवळ मांडण्यात आल्या. यावर आमदार प्रमोद जठार यांनी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्य मंत्री यांची भेट घेऊन लवकरच प्रलंबित समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी आमदार प्रमोद जठार, डॉ.जयप्रसाद रामानंद, जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, जिल्हा उपाध्यक्ष राजेश भाटलेकर आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |